Special Report : दृष्टीबाधित विद्यार्थ्यांचा स्वयंरोजगारातून जगण्याचा संघर्ष
सध्या देशात बेरोजगारीची समस्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दृष्टीबाधित व्यक्तींना रोजगार मिळावा यासाठी अमरावतीमध्ये अश्रित अंध कर्मशाळेत दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते आहे. येथील विद्यार्थी स्वतः फाईल तयार करून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक नामांकित प्रशासकीय कार्यालयांच्या मागणीनुसार तिथे फाईल तयार केल्या जातात. फाईल तयार करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते ? या संपूर्ण कार्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...