युवकांनी आता स्वयं रोजगाराकडे वळावे - देवेंद्र फडणवीस
युवकांनी आता स्वयं रोजगाराकडे वळावे असं मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते पंतप्रधान रोजगार सर्जन कार्यक्रमाच्या नागपुरातील एका विशेष कार्यशाळेत बोलत होते.
नागपूर : नोकरी मागायला सगळे येतात मात्र स्वयं रोजगार करण्याकडे वळत नाही , युवकांनी आता स्वयं रोजगाराकडे वळावे असं मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते पंतप्रधान रोजगार सर्जन कार्यक्रमाच्या नागपुरातील एका विशेष कार्यशाळेत बोलत होते.
खादी व ग्रामोद्योग आयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून विविध रोजगार निर्माण करणाऱ्या क्षेत्रा संदर्भात गरजू तरुणांना माहिती देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी छोटे - छोटे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून रोजगार कसे निर्माण होतात याबाबत माहिती देण्यात आली.
दरम्यान या छोट्या उद्योगांना बळ द्यायच काम महत्वाचं आहे , कोरोनानंतर या उद्योगांना मदत केली तर ते चांगले सुरू राहतील, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूरला व्हावं ही अपेक्षा आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं फडणवीस यांनी म्हंटले आहे.
हा कार्यक्रम सामान्य माणसापर्यंत पोहचविण्यासाठी सगळे प्रतिनिधी काम करतील , खादी ग्रामोद्योग च्या माध्यमातून चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात आला यातून रोजगार निर्मिती होईल. योजना सुलभ करण्यासाठी गडकरी यांनी काम केलं, योजना अनेक तयार होतात पण त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले