कोणी काय खावं, काय परिधान करावं? हे तुम्हीच ठरवणार का?, सुप्रिया सुळेंचा कडाडल्या
सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या दरम्यान कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावरून संसदेत गदारोळाचा मुद्दा उपस्थित केला. कोणते कपडे हेच ठरविणार. काय खायचे, कुठे कधी जायचे हेच ठरविणार, काय बोलायचे काय नाही बोलायचे, काय शेअर करायचे काय फॉरवर्ड करायचे हेच ठरविणार? याला हुकूमशाही म्हणायचे तर, आणीबाणीचा राग आमच्यावर काढणार. यांच्यावर टिका केली तर देशद्रोहाचा खटला टाकणार. लोकशाहीसाठी आंदोलन केले तर आम्हाला आंदोलनजीवी म्हणून हेटाळणार. लोकहो आता तुम्ही काय करणार? श्वास कोंडला असून संकट आपल्या दारात येऊन उभे आहे, अशा मराठी ओळी सादर करून सुप्रिया सुळे यांनी या घटनाक्रमावरील अस्वस्थता व्यक्त केली.