भारत तुटलाच कुठे? विचारणाऱ्यांना योगेंद्र यादव यांचे उत्तर

राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. दरम्यान भारत तुटलाच कुठे आहे? असा सवाल भाजप समर्थकांकडून विचारला जात आहे. त्याला योगेंद्र यादव यांनी उत्तर दिले आहे.;

Update: 2022-11-09 10:15 GMT

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. त्यापार्श्वभुमीवर भारत तुटलाच कुठे आहे? आणि भारत तुटलाच नसेल तर जोडण्याची काय आवश्यकता आहे? असा सवाल भाजप समर्थक विचारत आहेत. त्याला योगेंद्र यादव यांनी उत्तर दिले आहे. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे बोलत होते.

यावेळी बोलताना योगेंद्र यादव म्हणाले, जे लोक देश कुठे तुटला म्हणत आहेत. त्यांना हे कळायला हवं की, गेल्या आठ वर्षात देशात कितीतरी घटना अशा घडल्या आहेत. ज्यातून केवळ देश तुटण्याचा संदेश जातो. काही विशिष्ठ धर्मियांना टार्गेट करून बोलले जाते. महिलांना इथे सुरक्षित वाटत नाही. दलित,मजुर ,कष्टकरी यांचे आयुष्य सुरक्षित नाही. महागाईने देशाचे कंबरडे मोडले आहे. या सगळ्या बाबी पाहता ही सारी लक्षणे देश तुटण्याच्या मार्गावरची आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात या यात्रेचे आगमन होताना ही यात्रा महायात्रा होईल, असं मत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले आहे.

Full View

Tags:    

Similar News