सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघातील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील काय डोंगर, काय झाडी, काय हाटेल, या डायलॉगमुळे प्रसिध्दीच्या झोत्यात आले होते. अशातच ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आजपासून सोलापूर जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेला सुरवात केली. त्यावेळी आपल्या भाषणातून शहाजी बापू पाटील यांच्यावरती प्रश्न चिन्हं उपस्थित करुन त्यांच्यावरती टीका केली.
मागील दोन वर्षात तुमच्या बायकोला दोनशे रुपये देयाला नव्हते. मग दोन वर्षात एक एकर मध्ये बंगला बांधायला पैसा कुठून आणला, असा थेट प्रश्न महायात्रेत अंधारे यांनी शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात उपस्थित केला. यापूर्वी ही शहाजी बापू पाटील यांनी आपल्या भाषणातून आपण निष्कलंक असल्याचा शाब्दीक दाखला दिला होता. तसेच दोनशे रुपयांची साडी बायकोसाठी खरेदी करणे शक्य होतं नाही. असे वारंवार शहाजीबापू आपल्या भाषणातून सांगत असायचे. त्यामुळे लवकरात लवकर उत्तरे शहाजी बापू पाटील यांनी द्यावीत अशी विनंती सुषमा अंधारे यांनी केली आहे.
सूतगिरणीसाठी घेतलेली जमीन ती कुठे आहे? तसेच पतंगराव कदम क्रेडिट सोसायटी तुम्हीचं स्थापण केली होती. त्याचं काय झालं? असाही सवाल सुषमा अंधारे यांनी शहाजी बापू पाटील यांना आपल्या भाषेणातून केला. तसेच अंधारे यांनी आपल्या भाषणातून पुढचा प्रश्न उपस्थित केला की, राधाकृष्ण दूध संघाचीही स्थापना शहाजी बापू पाटील यांनीच केली होती. त्याचं काय झालं? त्यानंतर कुकुटपालन देखील तुम्हीचं केले होते. त्यामुळे उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे शहाजी बापू पाटील यांच्यावरती टीका अंधारे यांनी केली. अंधारेंच्या प्रश्नांवर शहाजी बापू पाटील यांच्या अडचणीत वाढ होईल का? ते येणाऱ्या दिवसांत पाहवं लागेलं