भाजपचा प्लान B?
रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण : भाजप सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता नाही?;
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत जाण्याची तयारी असल्याचे एकनाथ शिंदे यांना सांगितले होते, असे वृत्त मॅक्स महाराष्ट्रने दिले आणि दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यास शिवसेना तयार असल्याची घोषणा केली. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्रने दिलेल्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पण महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडली तरी भाजप शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची शक्यता कमी आहे, याचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांनी...