अजित पवारांना आव्हान देणारा ताकदीचा नेता कोण?

Update: 2022-12-29 07:32 GMT

सध्या नागपूर हिवाळी अधिवेशन सुरु असताना २०२४ विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन आरोप-प्रत्यारोप करणारे नेते सध्या पाहायाला मिळतं आहेत. अश्यातच काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांवर टीका केली. "२०२४ मध्ये निवडणुकीच्या काळावधीत अजित पवार यांचा जनता करेक्ट कार्यक्रम करेल", असे विधान बावनकुळे यांनी केले होते. तसेच "भाजपचे अनेक नेते देखील बारामतीचे दौरे करत आहेत. त्यामुळे बारामतीमधील जनतेचा विकास झाला नाही," असेही काल बावनकुळे यांनी म्हटले होते.

बावनकुळेंच्या टीकेला अजित पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले " हे एकल्यापासून मला काल रात्रभर झोप लागेना," असा टोला अजित पवार यांनी बावनकुळे यांना लगावला. तसेच पवार पुढे म्हणाले की, "एवढा मोठा ताकदीचा नेता आव्हान देत असेल, तर मी घाबरलो आहे. त्यामुळे मला राजकारण सोडून द्यावसे वाटते. बावनकुळे यांच्या विधानानुसार मला २०२४ मध्ये निवडणुक ल़ढवण्याची इच्छा होत नाही. पराभवामुळे अपमानित होण्यापेक्षा निवडणूक न ल़ढवलेली बरी." असा विनोद बावनकुळेंच्या टीकेवर अजित पवार यांनी केला.




Tags:    

Similar News