मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा द्या; विरोधकांनी अधिवेशनात गदारोळ का घातला?
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक होताना पाहायाला मिळाले नव्हते, परंतू दुसऱ्या दिवशी विरोधक अधिकच आक्रमक होऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली.;
नागपूर उमरेड रस्त्यावरील मौजा हरपूर येथील एक लाख वर्ग मीटर क्षेत्रफळ असलेली जमिन सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मागील सरकारमध्ये नगर विकास विभागाचे मंत्री शिंदे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत १६ जणांना ही जमिन लीज करारावर देण्याचे निर्देश नागपूर सुधार प्रन्यालसा दिले. यावर विरोधकांनी आरोप केला आहे की, नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी नागपूर सुधार प्रन्यासला दिलेले निर्देश कायद्याला धरुन नाहीत.
एकदा अधिग्रहण झालेली जमिन ज्या उद्दीष्टांने अधिग्रहण झाले होते, त्या उद्दीष्टाशिवाय दुसऱ्या कामासाठी वापरायची असल्यास त्याचा नियमाप्रमाणे लिलाव करावा लागतो. या प्रकरणात वर वर पाहता तसे काहीही दिसत नाही. एवढेच नाही तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नगर विकास विभागाने १६ प्लॉट धारकांच्या नावे संबंधित जमीन लीज करार करण्याचे निरेदश दिले,
ही बाब आक्षेपार्ह असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. आणि याबाबत त्यांनी दोन्ही सभागृहात यावरुन गोंधळ घालत यांच्या चौकशीची मागणी केली आहे. म्हणून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागितला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक बॅकफूटवर असताना पाहायाला मिळाले होते.