आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार का मानले ?

आसाममधील पूरग्रस्तांना एकनाथ शिंदे यांनी ५१लाखाची मदत जाहीर केली आहे त्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री काय म्हणतात ?;

Update: 2022-06-29 09:59 GMT

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शिंदेंचे आभार का मानले?

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी ठाकरे सरकार विरुद्ध बंड केलं आहे.आठवडाभर हे महा सत्तानाट्य चालू आहे. सध्या आसाम राज्यातील गुवाहाटी (Guvahati)मध्ये त्यांच्या समर्थनार्थ ४० हुन अधिक आमदार असल्याची माहिती दिली जाते.राज्यात सरकार अस्थिर झाल्याची परिस्थिती उदभवली आहे. आसाम राज्यात सुद्धा महापुरामुळे नागरिक त्रस्त आहेत.

अशा परिस्थितीत गुवाहाटीतील बंडखोर आमदारांचा हॉटेल मधील खर्च यावर आसाम राज्यातून संताप व्यक्त झाला होता ,या पार्श्वभूमीवर भूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आसाम मधील पूरग्रस्त बांधवांसाठी मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याचे ट्विट केले होते ."आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय."असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं होत .त्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केलं आहे . मराठी भाषेतून त्यांनी आपल्या ट्विटरवर शिंदेंना धन्यवाद देणार ट्विट केलं आहे .

"मा. श्री. शिंदे साहेब व शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांचे धन्यवाद आपण आसामच्या महापुरा साठी ५१ लाखाची मुख्यमंत्री मदत निधी केली आपले खुप आभारी आहोत."असं ट्विट करून मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत .

Tags:    

Similar News