निलेश राणे यांनी ट्विट डिलीट का केले? काय हेते ते ट्विट..

Update: 2023-02-25 05:12 GMT

राज्यातील राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालला आहे. त्यात आता महिलांनी तर राजकारणात यावं की नाही अशी परिस्तिथी आहे. आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांना शिवीगाळ करण्यात आजचे राजकारणी व्यस्त आहेत. राज्यातील नागरिक हजारो प्रश्नांनी ग्रस्त आहेत पण याचे त्यांना काहीच देणे-घेणे नाही. सकाळपासून संध्याकाळ पर्यंत याने काही म्हंटल की त्याला काय तर म्हणायचं आणि त्याने काय म्हंटल की तो आपल्याला काय म्हणाला आहे त्याहून आपण किती अर्वाच्य किंवा खालच्या दर्जाचे त्याला काही तर म्हणायची अशी जणू स्पर्धाच चालू आहे. आणि या स्पर्धेत राणे कुटुंबीय अगदी अग्रेसर आहे. अधिकाऱ्यांना धमक्या देण्यापासून त्यांच्यावर हात उचलण्यापर्यंत असे यांचे अनेक प्रकार आज सर्वांसमोर आहेत. मागच्या ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान तर यांनी मतदार राजाला सुद्धा मतदान करण्यासाठी प्रलोभने दिली. आता तर निलेश राणे यांनी हद्दच पार केली आहे. अजित पवारांना उत्तर देताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी ''तुम्हाला एका महिलेने जन्म दिला की तुम्ही कुठल्यातरी फटीतून पडलात.'' ही भाषा त्यांनी वापरली..

अजित पवार आज जाहीर करा, तुम्हाला एका महिलेने जन्म दिला की तुम्ही कुठल्यातरी फटीतून पडलात. 




 


 


अजित नको तिथे नाद करतो आणि पळतो... त्यासोबत हा फोटो त्यांनी वापरला आहे.. 



 


 मुत्र्या अजित पवार शासकीय कामात व्यस्त...त्यासोबत हा फोटो त्यांनी वापरला आहे..



 


 शरद पवारांना एका महिलेने आणि अजित पवाराच्या भाषेत एका बाईने त्यांची जागा दाखवली. अख्खी काँग्रेस एक बाई चालवते, अजित पवारांना महिलांचा अपमान करायचा आहे का?? अजित पवार म्हणजे मनाचा भिकाराडा माणूस... धरणाची अवलाद. 



 


हे सर्व ट्विट्स त्यांनी आता डिलीट केले आहेत. पण याचे स्क्रीनशॉट आता समाजमाध्यमांवर व्हायरल होतं आहेत. हे ट्विट डिलीट केल्यानंतर त्यांनी निलेश राणे यांच्या ट्विटर हॅंडल वर एकच ट्विट दिसतं आहे.  

आता निलेश राणे अजित पवारांवर इतके का भडकले आहेत. अचानक त्यांनी असे काही ट्विट केले पण बहुतेक त्यांना त्यांची चूक लक्ष्यात आली आणि त्यांनी आपले सगळे ट्विट डिलीट केले.. खरं तर या राजकारण्यांना महिला सन्मान हा फक्त मातापुरताच मर्यादित असल्यासारखं वारंवार वाटतं. महिलांच्या नावाने मते मागायची आणि त्याच महिलांचा वारंवार अपमान करायचा. अजित पवार देखील त्यातलेच.., तर झालं असं होतं, कसाब पोटनिवडणुकीत प्रचारादरम्यान अजित पवारांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले लोक पुढे राजकारणात यशस्वी झाले नाहीत, हे सांगताना अजित पवार यांनी काही उदाहरणं दिली होती.

छगन भुजबळ शिवसेनेतून १९ लोकांसह बाहेर पडले होते. त्यानंतर भुजबळ यांच्यासकट सगळं लोक पराभूत झाले. नारायण राणे यांनी शिवसेना फोडली. त्यांच्यासोबतचे पक्षातून बाहेर पडलेले सर्व आमदार पडले. स्वत: नारायण राणे दोनदा पडले. एकदा कोकणात, दुसऱ्यांदा मुंबईतील वांद्रे येथे उभे होते, तिथेही पडले. तिथे तर नारायण राणे यांना एका बाईने पाडलं...

बाईने पाडलं म्हणजे दादा तुम्ही महिलांना कमी लेखात का? राजकानात किंवा समाजकारणात महिलांना कमी लेखू नका म्हणणारे तुम्हीच. आता तुमच्या बोलण्यातून तुमचा महिलांविषयी असलेला आदर दिसून आलाच. आता अजित पवार काय आणि निलेश राणे काय हे एकाच माळेतील मणी. आपल्याच घरात महिला काय करू शकतात याच उत्तम उदाहरण असताना अजित पवार असं कसे म्हणून शकतात. महिलांच्या सन्मानासाठी, महिलांच्या हक्कासाठी स्वतः शरद पवार अनेक वेळा लढले आहेत. महिलांच्या सन्मानाविषयी, समानतेविषयी शरद पवार नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आता शरद पवारांचा वारसा पुढे नेणाऱ्या अजित पवारांना हे बोलणं शोभतं का? राज्याच्या राजकारणात नक्की काय सुरु आहे? या सगळ्या विषयी तुम्हाला काय वाटतं हे देखील नाकी व्यक्त करा.. 

Tags:    

Similar News