राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार आणि राष्ट्रपती राजवट लागेल असा दावा भाजप नेते करत असतात. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी आपल्याला महाराष्ट्रात भाजप सोबत येण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्यात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार राज्यात खूप प्रभाव पाडू शकलेले नाही. असे असले तरी राज्यात या तिन्ही पक्षांपेक्षा सर्वाधिक अडचणीत असलेला पक्ष भाजप आहे, याचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी...