कोण होणार विधानसभा अध्यक्ष ? शिवसेनेचे राजन साळवींविरुद्ध भाजपचे राहुल नार्वेकर रिंगणात

अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी भाजपा आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.;

Update: 2022-07-02 09:37 GMT

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात महा सत्तानाट्य सुरु झालं होतं .एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसोबत महाविकास आघाडी विरुद्ध बंड केल.या बंडखोरीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने यश आल्याचं दिसत आहे .भाजपच्या मदतीने शिंदे गट सत्ता स्थापन करणार आहे .त्यासाठी बहुमताची चाचणी घेण्यात येणार आहे .त्यामुळे ३ आणि ४ जुलै ला हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी भाजपा आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.


नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाले होते.त्यामुळे नरहरी झिरवाळ हे विधानसभेच्या अध्यक्षांची जबाबदारी घेत होते. उद्धव ठाकरे सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची राज्यपालांना विनंती केली होती. मात्र, राज्यपालांनी ही विनंती मान्य केली नव्हती. आता ठाकरे सरकार पडले आहे. शिंदे सरकार आणि भाजप असं मिळून सरकार स्थापन होणार आहे.आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीला गती मिळाली आहे. या संदर्भात विधिमंडळ सचिवालयाकडून परीपत्रक जारी करण्यात आले आहे. ३ जुलै रोजी होणाऱ्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे.

राधाकृष्ण विखे पाटील उमेदवारीसाठी होते चर्चेत

ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा चांगला अनुभव आहे . त्यामुळे काँग्रेसमधून राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केलेल्या विखे पाटील यांचं नाव सुरुवातीला उमेदवारीसाठी चर्चेत होते. पण भाजपाच्या बैठकींनंतर राहुल नार्वेकरांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.

Tags:    

Similar News