Uddhav Thackeray rally : उद्धव ठाकरेंची सभा, निशाण्यावर कोण?

Uddhav Thackeray in Jalgaon : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांची खान्देशात पहिलीच सभा होत आहे. या सभेत उध्दव ठाकरे यांच्या निशाण्यावर कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Update: 2023-04-23 05:33 GMT

Uddhav Thackeray : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहेत. माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव पाटलांसह पाच आमदार शिंदे गटात सामील झाले होते. जिल्ह्यातील खान्देशातील संपूर्ण शिवसेनाच शिंदे गटात सामील झाली होती. जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील (Gulabrao patil), पारोळा-एरंडोल मतदार संघाचे चिमणराव पाटील (Chimanrao Patil),पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil), चोपडा मतदार संघाचे आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे (Latabai Sonawane), मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) हे सर्व कट्टर शिवसेनेचे असतांनाही शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे खान्देशात एकेकाळी बालेकिल्ला असलेली शिवसेनेत आता एकही मोठा नेता नाही. यामुळे उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ आहेत. राज्यातील आणि जिल्ह्यातील शिवसेनाच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घेऊन गेल्याने शिंदे हे तर ठाकरेंच्या निशाण्यावर राहतीलच पण लक्ष गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील किशोर पाटील हेच सर्वाधिम निशाण्यावर राहतील. कारण स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि पुन्हा शिवसेना उभी राहण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेतून फुटलेले आमदार निशाण्यावर असतील.

विशेष म्हणजे गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील हे सर्वाधिक उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर असणार आहेत.उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे संपूर्ण खान्देशच लक्ष असणार आहे.पाचोऱ्याचे आमदार किशोर हे माजी आमदार आर ओ पाटील यांचे पुतणे आहेत. त्यातच त्यांची कन्या वैशाली सूर्यवंशी ( पाटील ) ह्या आता उद्धव ठाकरें बरोबर असून किशोर पाटील यांच्या विरुद्ध दंड थोपटले आहेत यामुळे भविष्यात आमदार भाऊ आणि बहीण यांच्यात राजकीय सामना होणार असल्याने त्याची रंगीत तालीम रविवारच्या उद्धव ठाकरेंच्या सभेने होणार आहे.

ठाकरे-शिंदे गटाची वाकयुद्ध आता गुद्द्यांवर?

उद्धव ठाकरेंच्या सभेआधीच गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आर ओ त्यात्या यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी येत आहेत तर त्यावर बोलावं , आमच्या विरोधात बोललेले तर सभेत घुसू असा इशाराच दिल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे. राऊत यांनीही सभेत घुसून दाखवा परत कसे जातील हे पाहू असा प्रति इशारा दिल्याने आणखीनच वातावरण टाईट झालं आहे.शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यानीही गुलाबराव पाटील सभेत घुसले तर 51 हजारांच बक्षीस देउ अस आव्हान दिले आहे.तर शिंदे गटाचे कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या सभेत गुलाबराव पाटलांचे मुखवटे घालून आपण घुसणार असल्याचा दावा केलाय.यामुळे शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांत सभेस्थळी काहीही घडू शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शिंदे-ठाकरे गटाची लढाई आता वॉक युद्धात ऐवजी गुद्द्यांवर येऊन ठेपली आहे.

गुलाबराव-राऊत वाकयुद्ध

उद्धव ठाकरेंच्या सभे आधी गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यात वॉकयुद्ध पाहायला मिळालं

उद्धव ठाकरेंना बोलण्याचा अधिकार, मात्र संजय राऊत यांनी 35 वर्षातून घरातून आम्हाला हाकलल संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली शिवसैनिक एकमेकांच्या पाठीत काठ्या मारत आहे त्याला संजय राऊतच जबाबदार आहेत. जळगावात जिल्ह्यात सभेला येताहेत व्यवस्थित बोला नाहीतर आमचे शिवसैनिक घुसतील आणि नंतर सरदार घुसेल असा असा इशारा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला होता यावर संजय राऊत हे काल जळगावात पोहचल्यावर गुलाबराव पाटलांना उत्तर देत म्हटलं की जळगावात घुसलो, अस सांगत तुम्ही उद्धव यांच्या सभेत घुसून दाखवा असं पुन्हा एकदा आव्हान गुलाबराव पाटलांना दिलं. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर शिंदे गटाकडून खासकरून गुलाबराव पाटील काय उत्तर देणार हेही महत्वाचे आहे...

Tags:    

Similar News