मंत्रीमंडळात कुणाला संधी मिळणार? माजी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा खुलासा

Update: 2022-07-24 04:36 GMT

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन करून तीन आठवड्यांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? याविषयी सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे. त्यापार्श्वभुमीवर माजी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मोठा खुलासा केला आहे.

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका सुरू झाला. त्यातच औरंगाबादच्या नामांतराला आधी स्थगिती आणि नंतर छत्रपती संभाजीनगर नाव करण्याचा निर्णय घेतला. मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार केला नसल्याने त्यांच्यावर राज्यभरातून टीका होत आहे. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या विस्ताराकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान हरिभाऊ बागडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठा खुलासा केला. त्यामध्ये हरिभाऊ बागडे म्हणाले की, लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र यासाठी शहरातून कोणाचा नंबर लागेल हे सांगता येऊ शकत नाही. याबाबत माहिती फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सांगू शकतात अशी प्रतिक्रिया दिली.

राज्याच्या मंत्रिमंडळाचे विस्तार लवकरच होणार असून यासाठी भाजपाचे अनेक आमदार इच्छुक असल्याचे चित्र मराठवाड्यात दिसत आहे. आता कोणाची वर्णी लागेल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असताना पत्रकारांनी आमदार हरिभाऊ बागडे यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की हे कोणी सांगू शकत नाही. कारण हे फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनाच माहीत असून त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली त्यांनी काम करायचे बाकीच्यांनी पक्षाने ठरवून दिलेली जबाबदारी पूर्ण करायची असे संकेत त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Tags:    

Similar News