मतदाराला मतदानासाठी मदतनीस कधी दिला जातो?

Update: 2022-06-20 13:22 GMT

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानाला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने तो फेटाळला आहे, काँग्रेसने केंद्रीय आयोगाकडे या निर्णयाला आव्हान दिले आहे. भाजपनेही याबाबत आपले उत्तर सादर केले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी मतदाराला मतदान करण्यासाठी मदतनीस कधी दिला जातो याची माहिती दिली आहे.

"मतदाराला मतदान करण्यासाठी मदतनीस चार प्रकारात दिला जातो.

1 - अस्थिविकारामुळे आलेली अक्षमता

2 - दृष्टीहिनता

3 - श्रवण वा वाक अक्षमता

4- इतर अक्षमता

Conduct of Election Rules 49 N अन्वये मतदान करण्यास मदत ही केवळ अंध, श्रवण नि वाक अक्षमतेच्या मतदाराबाबत आहे.

मतदार मदतनीस याची व्याख्या नेमकी कोणती?

मतदानास सहाय्य करणारा की मतदारास मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी सहाय्य करणारा ?

व्हीलचेअरवरील मतदाराच्या मदतनीसाचे काम हे मतदाराला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे असते. म्हणजे तो मतदार मतदान केंद्रात जाण्यास अक्षम असतो, मतदान करण्यास नव्हे !

अंध मतदारास मात्र मदतनीस मतदान केंद्रात घेऊनही जातो आणि प्रत्यक्ष मतदानात सहाय्य देखील करू शकतो. मदतनीसाच्या व्याख्येबाबत, मदतीच्या स्वरूपाबाबत आणि इतर अक्षमतेबाबत केंद्रीय आयोगाकडील विशेषाधिकार यात मोठी भूमिका बजावेल असं दिसतंय !

Tags:    

Similar News