आंबेडकर स्मारकाची जमीन खासगी ठेकेदाराला देण्यात आली : अमोल मिटकरी

Update: 2022-12-20 12:33 GMT

आज अधिवेशनाचा दुसरा दिवस. हे अधिवेशन सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमा समोर आपली भूमिका स्पष्ट केली.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्याच काळात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गच काम झालं होतं. परंतू त्याचे सर्व श्रेय भाजपने घेतले आहे, अशी टीका आमदार मिटकरी यांनी केली. वळगंगा, वैणगंगा प्रकल्पाचे कामही महाविकास आघाडीच्या काळात झालं होतं. परंतू हे काम शिंदे-फडणवीस सरकारने थांबवलं आहे. राष्ट्रवादीचे नेते सुरक्षित आहेत का या प्रश्नांवर मिटकरी म्हणाले, "राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर बेळगावात लाठी हल्ल्याचा प्रयत्न झाला. कर्नाटकातील बेळगाव, कारवार, निपाणी या भागातील मराठी भाषिकांवर हल्ला केला जातोय.

नागपूर येथील अंबाझरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठीची 40 एकर जमीन भाजपचे माजी मंत्री आणि खासगी विकासकाला नागपूर महानगरपालिकेने हस्तांतरीत केली, असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर केला. बुलडोझरच्या सहाय्याने हे स्मारक जमीनदोस्त करण्यात आल्याचा गंभीर आरोपही आमदार मिटकरी यांनी केला. याविरोधात सुमारे 10 हजार आंबेडकरी अनुयायांचा भव्य मोर्चाच विधिमंडळावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे अधिवेशन वेळ काढूपणाचे अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या ठिकाणी पोलिसांच्या जेवणाची सोय करण्यात आली नाही. सीमावाद प्रश्नावर बोलू नये, राज्यपालांच्या हकालपट्टी बद्दल बोलू नये, महापुरुषांच्या अपमानाबदद्ल बोलू नये यासाठी शिंदे-सरकारचा प्रयत्न आहे.


Full View

Tags:    

Similar News