मोदींच्या मंत्र्यांची डिग्री BCA की मॅट्रिक, निशीथ प्रमाणिक वादाच्या भवऱ्यात
मोदी नंतर मोदींच्या मंत्र्यांच्या डिग्री बाबत देखील आता सवाल उपस्थित केले जात आहे. काय आहे सर्व प्रकरण?;
मंत्री आणि त्यांच्या शिक्षणासंदर्भात सतत नव नवीन बातम्या समोर येत असतात. स्वत: देशाच्या पंतप्रधांनाच्या शिक्षणाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात. आता मोदी सरकार मधील सर्वात तरुण आणि गंभीर गुन्हे दाखल असलेले मंत्री अशी ओळख असणाऱे निशीथ प्रामाणिक यांच्या शिक्षणाबाबत देखील वाद निर्माण झाला आहे.
केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या निशिथ प्रामाणिक यांच्या शिक्षणावर आता प्रश्न चिन्ह उभा राहिलं आहे. तृणमूल कॉंग्रेस नेत्याच्या शिक्षणावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.. निशीथ प्रामाणिक हे पदवीधर आहेत की फक्त दहावी पास आहेत. असा सवाल त्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मंत्री झाल्यानंतर निशिथ प्रामाणिक यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर अँप्लिकेशन (बीसीए) दाखवली आहे. मात्र निवडणुकीदरम्यान प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली उच्च शैक्षणिक पात्रता माध्यमिक शिक्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कूचबिहारचे तृणमूल नेते पार्थ प्रतिम रॉय यांनी आपल्या फेसबुक पेजवर या माहितीसह एक पोस्ट सुद्धा केली आहे.
भारत सरकारच्या संकेतस्थळावर (india.gov.in) या संकेत स्थळावर निशीथ प्रामाणिक यांना बीसीए पास दाखवलं आहे. तसंच त्यांनी ही डिग्री बालकुंडा ज्युनियर बेसिक स्कूलमधून प्राप्त केली आहे. परंतु 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी निशिथ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचं शिक्षण माध्यमिक पर्यंत झाल्याचं नमुद केलं आहे. त्यांनी त्यांचे शिक्षण लाल बहादूर शास्त्री विद्यापीठातून घेतले आहे. आणि याच शैक्षणिक पात्रतेच्या फरकामुळे तृणमूल काँग्रेसने आता निशाणा साधला आहे.
बंगालचे भाजपा नेते निशिथ प्रामणिक, 2019 मध्ये कूचबिहार लोकसभा मतदार संघातून जिंकल्यानंतर खासदार म्हणून आपला पहिला कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. दरम्यान 7 जुलैला त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ठ करण्यात आलं आहे. निशिथ प्रामाणिक हे 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.