शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदाची गोष्ट : छगन भुजबळ

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-06-12 11:43 GMT
शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदाची गोष्ट : छगन भुजबळ
  • whatsapp icon

 शरद पवार हे राष्ट्रपती झाले तर आनंदाची गोष्ट असून महाराष्ट्राकरिता गर्वाची बाब राहील असे पालकमंत्री छगन भुजबळ येवला येथे सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक यांच्या सत्कार  कार्यक्रम प्रसंगी आले असता पत्रकारांनी विचारले असता या वेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांना ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात आमंत्रण दिले असून यावेळी राष्ट्रपती पदाकरिता उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव सुचविले जाणार आहे.याबाबत भुजबळ यांना विचारले असता यावेळी भुजबळ म्हणाले की...  ममता बॅनर्जी यांनी जेवढे ही विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री आहे. तसेच विरोधी पार्टीचे अध्यक्ष नेता आहे.

त्यांना आमंत्रित करून त्यांच्या सोबत मीटिंग घेऊन राष्ट्रपती पदा करता कोणाला उभे केले जावे या गोष्टी ममता बॅनर्जी बघत असून याबाबत सगळ्याच  विरोधीपक्ष नेत्यांशी विचार विनिमय करत असून शरद पवार यांना राष्ट्रपती पदा करता उमेदवार उभे केले जात असून याबाबत पवार साहेबांनी हा म्हटले की नाही याबाबत मला काही माहीत नसून महाराष्ट्रातून शरद पवार साहेब हे एवढ्या मोठ्या पदावर गेल्यास नक्कीच आनंदाची व गर्वाची गोष्ट महाराष्ट्र करता राहील असे छगन भुजबळ म्हणाले. 

Tags:    

Similar News