सचिव वाझे पासुन ते चंद्रकांत खैरे यांच्या मुलापासून पैसा ची लुटालूट महविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती त्यावरुन हे वसुली चे सरकार होत हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे.
सचिन वाझे पासुन ते चंद्रकांत खैरे यांच्या मुलापासून पैशाची लयलूट महविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. त्यावरुन हे वसुलीचे सरकार होत हे पुन्हा पुन्हा स्पष्ट झाल्याचे भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले आहे. वाझे ते खैरे हीच खरी महाविकास आघाडी ची ओळख असल्याची टिका सुद्धा उपाध्ये यांनी यावेळी केली.
सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जमत नसेल तर राजीनामा द्यावा असे वक्तव्य केले. यावर उत्तर देताना केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांना वसूलीच्या प्रकरणी जेलमध्ये जावे लागले. काल सुद्धा खैरे यांच्या मुलामुळे हे पुन्हा एकदा समोर आलेले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काय काय झाले ते पहिल्यांदा सुप्रिया सुळे यांनी पाहावे आणि कोणी कुणाच्या राजिनाम्याची भाषा करावी, हे लक्षात घ्यावे. असे उत्तर उपाध्ये यांनी दिले.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जनतेच्या सेवेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करत असल्याचे उपाध्ये यावेळी म्हणाले. ते मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यामुळे पुन्हा पुन्हा हेच सिद्ध होत आहे की, महाविकास आघाडी सरकारमध्ये वाझे आणि खैरे हे खंडणीचा आधार होते, हे केशव उपाध्ये यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून अधोरेखित केले.