Vidhansabha monsoon season : अखेर बीडच्या जिल्हा पोलिस उपअधीक्षकाची बदली
अवैध धंद्याना पोलिसांनी अभय दिल्याचा आरोप करत भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी सरकारला घरचा आहेर दिला.;
बीड जिल्ह्याती अवैध धंद्याविरोधातील कारवाईत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी सरकारला धारेवर धरले. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर बीडच्या पोलिस उपअधीक्षकाच्या बदलीचे आदेश दिले आहेत.
भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्याच्या ग्रामिण पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. त्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत सरकारला धारेवर धरले. मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बीडच्या पोलिस उपअधीक्षकाची बदली करण्याचे आदेश दिले आहेत.
विधानसभेत लक्षवेधीमध्ये भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाईच्या ग्रामिण भागात अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे बंदी असलेला गुटखा, मटका, जुगार आणि बनावट दारू जोरात विक्री सुरू आहे. तर पोलिस निरीक्षकांनी या अवैध धंद्यांना अभय दिल्यानेच अशा प्रकारे अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप मुंदडा यांनी केला. तसंच पोलिस निरीक्षक वासूदेव मोरे यांनी 8 जुलै रोजी वरपगाव शिवारात बनावट दारूच्या कारखान्यावर छापा मारला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारू जप्त केली. त्याचबरोबर कारखान्याचा मालक फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. तो मालक दुसऱ्या दिवशीच्या छाप्यावेळी तिथे उपस्थित असणे यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचे सांगत नमिता मुंदडा यांनी पोलिस उपअधीक्षकांची बदली करण्याची मागणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलिस उपअधीक्षकाच्या बदलीचे आदेश दिले आहेत.