दिशा सालीन आणि राहुल शेवाळे प्रकरणी SIT, नीलम गोऱ्हे यांनी दिले निर्देश

Update: 2022-12-22 11:05 GMT

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी AU कोण आहे? असा सवाल सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी केला. त्यावरून सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे सभागृह तहकूब करावे लागले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस दिशा सालियन प्रकरणावरून चांगलाच गाजला. विधान परिषदेत दिशा सालियन प्रकरणी आमदार प्रवीण दरेकर यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन उपस्थित केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे सभागृह तहकूब करण्यात आले.

त्यानंतर पुन्हा झालेल्या सभागृह सुरू होताच आमदार अनिल परब यांनी नाव न घेता एका खासदारांवर महिलेच्या लैंगिक शोषणाचा आरोप केला. यावेळी सत्ताधारी भाजप नेत्यांनी AU AU घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृह स्थगित करण्यात आले. त्यानंतर पुन्हा सभागृह सुरू होताच चंद्रकांत पाटील यांनी दिशा सालियन प्रकरणी एसआयटी ची घोषणा केली. त्यानंतरही विधानपरिषदेत गदारोळ सुरू होता. यावेळी सभापती नीलम गोऱ्हे यांनी दोन्ही प्रकरणाची एसआयटी चौकशीचे निर्देश दिले.

Tags:    

Similar News