गॅस दरवाढीवरून चित्रा वाघ पंतप्रधान मोदी यांच्यावर भडकल्या
गेल्या अनेक दिवसांपासून देशातील महागाईचा दर वाढताना दिसत आहे. त्यातच घरगुती गॅसच्या दरात वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान चित्रा वाघ या पंतप्रधान मोदी यांच्यावर भडकल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे भाजप विरोधात देशात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगावचे पत्रकार राजू थोरात यांनी चित्रा वाघ यांचा एक जूना व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे. चित्रा वाघ या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर महागाईवरून सडकून टीका केली होती. तो व्हिडीओ राजू थोरात यांनी शेअर केला आहे.
यामध्ये राजू थोरात यांनी म्हटले आहे की, 'एक आठवणीतील व्हिडीओ, गॅस दरवाढ झाली की चित्राताई वाघ थेट मोदीजी यांच्यावर टीका करत. परवाही गॅस दरवाढ झाली अन महाराष्ट्राला एक आठवण झाली ती म्हणजे या ताईंची', असं म्हणत चित्रा वाघ यांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
या व्हिडीओत चित्रा वाघ यांनी युपीए सरकार आणि एनडीए सरकारची तुलना केली होती. तसेच पुढे बोलताना त्यांनी स्मृती इराणी महागाईच्या मुद्द्यावरून कशा रस्त्यावर यायच्या याचीही आठवण सांगितली होती. तर पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. पण आता गॅसच्या दरात पुन्हा 50 रुपयांची वाढ झाल्यानंतरही चित्रा वाघ याबद्दल अवाक्षर काढताना दिसत नसल्याने राजू थोरात यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
एक आठवणीतील व्हिडिओ
— Raju Thorat (@RajuThorat7) July 8, 2022
गँस दरवाढ झालेकी चित्राताई वाघ थेट मोदीजी यांच्यावर टीका करत
परवाही गँस दरवाढ झाली अन महाराष्ट्राला एक आठवण झाली म्हणजे या ताईची@supriya_sule @ChakankarSpeaks @neelamgorhe @Rupalispeak @RutaSamant @SakshnaSalgar
@NCPspeaks @AdvYashomatiINC @VarshaEGaikwad pic.twitter.com/8oM1v0kHLJ
चित्रा वाघ या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना महागाईसह गॅस दरवाढीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. मात्र आता चित्रा वाघ भाजपमध्ये आहेत. मात्र चित्रा वाघ यांनी महागाईच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींविरोधात घेतलेल्या भुमिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.