बुलेट ट्रेन साठी 6000 कोटी,पण शेतकरी उपाशी...

Update: 2022-12-29 11:12 GMT

महाराष्ट्रातील इतर विभाग विचारात घेता विदर्भातील उद्योग फारच कमी प्रमाणात असल्याचे दिसून येतात.यावर विधानपरिषद सभागृहात विरोधी पक्षनेते यांनी स्पष्ट मत मांडले आहे ."सोयाबीन, ज्वारी, कापूस ही महत्त्वाची पिके असून त्यावर प्रोसेसिंग करणे आवश्यक आहे. चिखली, अमरावती येथे मोठया प्रमाणात कापसाचे उत्पादन होत असून येथे टेक्स्टाईल हब उभारणे आवश्यक आहे. कापसाला ९ हजार रुपयांऐवजी ७ हजार भाव काही दिवसात झाला. यासाठी व्यापारी असोसिएशनने केंद्र सरकारकडे कापसाचे भाव कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कापसाच्या दराविषयी एक वेगळी स्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकत असल्याचे मत दानवे यांनी व्यक्त केले आहे .

सिंचन, उद्योग अनुशेष सातत्याने वाढत असताना, विदर्भात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका दानवे यांनी केली आहे .एकीकडे बुलेट ट्रेनला ६००० हजार कोटींचा निधी मंजूर केला मात्र शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीसाठी आवश्यक ३७०० कोटींच्या निधीसाठी अजूनही कोणतेच पाऊल उचलले नसल्याची टीका सुद्धा विरोधी पक्षनेते s यांनी केली आहे .

त्याचबरोबर विदर्भात मेडिकल, इंजिनिअरिंग कॉलेज किती असून येथे विद्यार्थ्यांचे शिक्षण कशाप्रकारे होते याकडे सरकारने लक्ष देण्याची सूचना दानवे यांनी केली.विदर्भात सरकारने इच्छाशक्ती व्यक्त केल्यास मोठे उद्योजक निर्माण होतील अशी इच्छा सुद्धा अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे .

त्याचबरोबर विदर्भातील उद्योगासोबतच विदर्भातील आरोग्य आणि शिक्षणाकडे सरकारचे लक्ष वळवले आहे .

मेळघाटशी कुपोषण जोडलं गेलं आहे. मेळघाटातील आरोग्य, शिक्षण व्यवस्थेची अवस्था दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली.मेळघाटातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी अंगणवाडी बालवाडी बाबत असलेली लोकसंख्येची अट शिथिल करण्याची मागणीसुद्धा केली आहे .

Tags:    

Similar News