उत्तर प्रदेशमध्ये लोकतंत्राचं 'लोपतंत्र' होतंय का?

up panchayat election 2021 Yogi adityanath BJP Uttar Pradesh Police why not take action up block panchayat against up violence;

Update: 2021-07-10 06:22 GMT

उत्तर प्रदेशमधील UP PANCHAYAT चुनाव 2021 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपकडून हिंसाचार करण्यात आल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या हिंसाचारावरून योगी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहेत. एका फोटोमध्ये महिलेची भर रस्त्यात साडी ओढली जात आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या नवीन डीजीपी वर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोबतच या हिंसाचार वरुन डीजीपीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. BLOCK PRAMUKH BJP

राज्याचे नवीन डीजीपी मुकुल गोयल यांनी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यांनंतर लगेचच एका ज्वेलर्स द्वारे देण्यात आलेल्या वृत्तपत्रातील फुल पेज जाहिरातीमुळे डीजीपी जोरदार चर्चेत आले होते. मात्र, डीजीपी मुकुल गोयल हे आता त्यापेक्षा अधिक चर्चेचा विषय झाले आहेत. एवढंच नाही तर योगी आदित्यनाथ यांच्यानंतर ते दुसऱ्या क्रमांकावर ट्विटरवर ट्रेंड होते. UPPOLICE



उत्तर प्रदेशमधील सीतापूर, कन्नौज, लखीमपूर, महाराजगंज, फतेहपूर, कानपूर नगर, कानपूर देहात, इटावा सोबतच इतर जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांनतर एका साधूच्या राज्यात लोकशाही वर घाला घातला जात असल्याच्या भावना लोकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.. UPPOLICE

पंचायत समितीच्या निवडणुकीतील नामांकनासाठी राज्यातील काही जिल्ह्यामध्ये झालेल्या या हिंसाचारात लाठ्या, गोळ्या, बॉम्बचा वापर करण्यात आल्याचं काही व्हिडीओमधून दिसत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांचे कपडे फाडण्यात आले, एवढंच नाही तर महिलांना देखील त्रास देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान सत्ताधारी भाजपचे वर्चस्व असल्याने, काही जिल्ह्यात विरोधी पक्षातील लोकांना उमेदवारीच दाखल करु दिली नसल्याचं वृत्त जन ज्वार ने दिले आहे. या हिंसाचाराच्या सुशासनाचे धिंडवडे उडाले असून पोलिस प्रशासनाने सत्ताधाऱ्यांना उघडपणे पाठिंबा दिला असल्याचं माध्यमांनी म्हटलं आहे. असा एखादाही जिल्हा नसेल तिथं हिंसाचार झाला नसावा. सत्तेसमोर प्रशासन सत्य दाबत असल्याचं चित्र सध्या उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळत आहे. YOGI SARKAR

पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करताना आणि या अगोदर झालेल्या पंचायत समितीच्या अध्यक्षांची निवडणूकीतील हिंसाचार पाहता उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचार विरोधकांनी प्रचार कसा करावा असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष दोन – दोन निवडणूक आयुक्त हे उत्तर प्रदेशमधून आहेत.

काही दिवसांपूर्वीच बंगाल निवडणुकीतील झालेला हिंसाचार व हत्याकांडावरून, तृणमूल कॉंग्रेसच्या लोकांवर आरोप केले जात होते. त्यांना टीएमसीचे गुंड सांगत निवडून आलेल्या सरकारला पाडण्याचा प्रयत्न केला जात होता. या घटनांवर नॅशनल चॅनलवर डीबेट शो सुरु होते. मात्र, घटनांचा हाच क्रम उत्तर प्रदेशमधील या निवडणुकांमध्ये पाहायला मिळत असताना आता माध्यमं नरमाईची भूमिका घेत आहेत.

उत्तर प्रदेश सध्या रामराज्य असल्याची चर्चा सुरु असते. या राम राज्यात सध्या कोणावरही लाठी, गोळ्या आणि बॉम्बचा वापर सुरु आहे. कोणत्याही महिलेचे कपडे रस्त्यावर उतरवले जात आहे. लोकशाहीचे असं पतन होत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शांत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 






UTTAR PRADESH, DGP UP MUKUL GOYAL, UP PANCHAYAT CHUNAV 2021, BLOCK PRAMUKH BJP, यूपी में कई जगह बवाल, नामांकन, UPPOLICE, BJP-RSS, YOGI SARKAR, BJP, BJP BHAKT

Tags:    

Similar News