सपाचा नवा भिडू भाजपची डोकेदुखी ठरणार का?

Update: 2021-10-21 08:02 GMT


उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये, ओप्रमकाश राजभर यांचा 'सुहेलदेव भारतीय समाज पक्ष' (SUBHSP) Suheldev Bharatiya Samaj Party आणि अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी एकत्र लढणार निवडणुका लढणार आहे. अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर ओम प्रकाश राजभर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 


याअगोदर, ओमप्रकाश राजभर यांच्या पक्षाची भाजपशी युती होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरत आता सुहेलदेव भारतीय समाज पक्ष' आणि सपा यांची युती झाली आहे. दरम्यान, या युतीमध्ये कोणाच्या किती जागा असतील? याबद्दल अंतिम निर्णय झाला नसला तरी येत्या निवडणुकीत 'सुहेलदेव भारतीय समाज पक्ष' आणि सपा एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे, हा भाजपसाठी एक मोठा इशारा असल्याचं म्हटलx जात आहे.  


प्रियांका गांधी यांनी महिलांना 40 टक्के उमेदवारी चा घेतलेला निर्णय, शेतकरी आंदोलन यामुळं अडचणीत सापडलेल्या भाजपला आता 'सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने' साथ सोडल्याने आगामी विधानसभा निवडणूकीत फटका बसण्याची शक्यता आहे.


पूर्वांचलच्या सुमारे दीड डझन जागांवर 'सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे' उमेदवार सपाच्या मदतीने लढतील. असा अंदाज आहे. दरम्यान, गाझीपूर, मौ, जौनपूर, देवरिया, बलिया, महाराजगंज आणि संत कबीरनगर जिल्ह्यांत सपा राजभर यांच्या पक्षासाठी जागा सोडणार आहे.

दरम्यान, अखिलेश यादव यांच्या भेटीनंतर ओमप्रकाश राजभर यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी असंही म्हटलंय की, भाजप सरकारचे चार दिवस बाकी आहेत, ज्यांनी दलित, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांसह सर्व घटकांचा विश्वासघात केला.



27 ऑक्टोबर रोजी रॅली... 


दरम्यान, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने 27 ऑक्टोबर रोजी पूर्वांचलच्या मऊ जिल्ह्यात रॅलीच आयोजन केलं आहे. राजभर हे या मेळाव्यात आपल्या निवडणूक युतीची घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे. अखिलेश यादव यांच्या भेटीनंतर जरी त्यांनी स्वतः आघाडीच्या भागीदाराबद्दल खुलासा केला असला तरी त्याची औपचारिक घोषणा मऊ येथील मेळाव्यात केली जाईल.


दरम्यान, या रॅलीमध्ये सपाचे प्रमुख अखिलेश यादव हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की, अखिलेश यादव स्वतः मऊ येथे होणाऱ्या रॅलीला संबोधित करतील आणि तेथे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढण्याची औपचारिक घोषणा करतील.


27 ऑक्टोबरनंतर आम्ही जागा वाटपाबद्दल बसून बोलू आणि सपाने जरी आम्हाला जागा दिली नाही तरी आम्ही त्याच्यासोबतच राहू.

Tags:    

Similar News