पंडित जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी हे "भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते" - गडकरी

पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेत नुकत्याच झालेल्या व्यत्ययामुळे दुखः व्यक्त करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सत्ताधारी आणि विरोधकांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असं म्हटले आहे.

Update: 2021-08-20 05:30 GMT

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी हे "भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते" असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. सोबतच सत्ताधारी आणि विरोधकांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि सन्मानाने वागले पाहिजे असंही गडकरी म्हणाले.

एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले की, नेहरू आणि वाजपेयी हे भारताच्या लोकशाहीचे दोन आदर्श नेते होते "अटलजींचा वारसा ही आमची प्रेरणा आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही भारतीय लोकशाहीमध्ये मोठे योगदान होते," असं ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनात संसदेत झालेल्या गोंधळाबाबत गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या अधिवेशनात तीन कृषी कायद्यांविरोधात, इंधन दरात वाढ आणि पेगॅससच्या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला होता. या मुद्द्यांवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली होती. त्यामुळे वारंवार सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना गडकरी म्हणाले की, "सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी एकदा आत्मपरीक्षण करायला हवे. कारण आज जो विरोधीपक्ष आहे तो उद्या सत्ताधारी असणार आहे. त्यामुळे दोघांच्याही भूमिका बदलत राहतात.

असाच प्रकारे गडकरी जेंव्हा महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होते तेंव्हा त्यांनी सभागृहात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. तेंव्हा मी अटलजींना भेटलो आणि त्यांनी मला सांगितले की लोकशाहीत काम करण्याचा हा कोणताही मार्ग नाही आणि लोकांपर्यंत तुमचा संदेश पोहोचवणे महत्त्वाचे आहे."

असं अटलजींनी मला त्यावेळी सांगितले होते असं गडकरी म्हणाले. , "मी माझ्या आयुष्यात इतकी वर्षे विरोधात काम केले आहे" असं सांगताना त्यांनी संसदेत नुकत्याच झालेल्या व्यत्ययामुळे दुखः व्यक्त केले.

Tags:    

Similar News