मोदींच्या मंत्रिमंडळातील ९० टक्के मंत्री कोट्याधीश...
गरीबांची सेवा करणार मोदींचे करोडपती मंत्री;
मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार Modi Cabinet expansion नुकताच पार पडला. या मंत्रीमंडळ विस्तारात ४३ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान या ४३ मंत्र्यांच्यासह मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता ७८ झाली आहे. मात्र, या ७८ मंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्री कोट्याधीश आहेत.
एडीआरच्या रिपोर्ट नुसार (ADR Report) मोदी यांच्या मंत्रिमंडळातील ९० टक्के मंत्री हे कोट्याधीश आहेत. ७८ मंत्र्यांपैकी ७० मंत्री कोट्याधीश आहेत. तर प्रति मंत्री सरासरी मालमत्ता १६. २४ कोटी रुपये इतकी आहे. मात्र, चार मंत्र्यांची संपत्ती ५० कोटी पेक्षा जास्त असल्याचं देखील समोर आलं आहे. त्यामध्ये चार मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया, पियुष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर या मंत्र्यांची संपत्ती ५० कोटी पेक्षा जास्त0 आहेत.
यामध्ये सर्वाधिक संपत्ती ज्योतिरादित्य सिंधिया यांची आहे. त्यांची संपत्ती ३७९ कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे नागरी उड्डायन मंत्रालय देण्यात आले आहे. वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांची देखील एकूण संपत्ती 95 कोटींपेक्षा जास्त आहे. तर एमएसएमई मंत्री नारायण राणे यांच्या नावावर ८७ कोटींपेक्षा जास्त, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे ६४ कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे.
प्रतिमा भौमिक यांच्याकडे 6 लाखांची संपत्ती...
दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांची मालमत्ता ही एक कोटीपेक्षा कमी असून सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे. जी निव्वळ ६ लाख आहे. त्यांना आपण सर्वात गरीब मंत्री म्हणून शकतो. त्यांनतर जॉन बारला यांच्या नावावर 14 लाख, तर कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्या नावे 24 लाख रुपयांची संपत्ती आहे.