केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी प्रवरानगरमध्ये सहकार परिषदेसाठी आले होते. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी आयोजित केलेल्या या काक्रमात पाहुण्यांची भाषणं झाली. यावेळी भाषण करणाऱ्या प्रत्येक मान्यवरांच्या मागे खासदार सुजय विखे पाटील उभे राहिलेले कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये दिसत होते. अमित शाह यांचे भाषण सुरू झाले तेव्हाही सुजय विखे पाटील तिथेच उभे होते. पण काहीवेळातच अमित शाहांचे बॉडीगार्ड तेथे आले आणि त्यांना सुजय विखेंना तिथून बाजूला जाण्यास सांगितले.