शिंदे सरकार राहणार की जाणार? उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी...

Update: 2023-01-09 14:26 GMT

गेल्या चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा फैसला उद्या सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस यांचं सरकार राहणार की जाणार? याकडे राज्यासह सर्व देशाचे लक्ष लागून राहिले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर हे घटनाबाह्य सरकार एकही दिवस सत्तेवर राहता कामा नये, असं वक्तव्य केले. आणि तसे आदेशच कोर्टाने द्यायला हवे, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी तारखावर तारखा जरी पडत असल्यातरी एक दिवस शिंदे-फडणवीस सरकार पडेल असे सांगत उद्याच्या निर्णयाकडे आम्ही अपेक्षेने पाहात आहोत, असं संजय राऊत यांनी सांगितले.

ज्या पद्धतीने पक्ष तोडण्याचा प्रयत्न झाला ते घटनेच्या कोणत्या नियमात बसते, असा सवालचं संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांसमोर उपस्थित केला. घटनेची मोडतोड करुन राज्यातील युतीचे सरकार पाडल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवर लागवला. हे देशात असंच सुरु राहणार असेल तर देशातील घटना काय कामाची? न्यायालयाचं महत्त्वचं उरणार नाही. देशातील न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. ज्यांनी घटनाबाह्य सरकार स्थापन केले. ज्यांनी पक्षांतर केले. त्यांचा विश्वास न्याय व्यवस्थेवर कमी आणि दिल्लीतील महाशक्तीवर जास्त असल्याचे दिसून येत आहे. अशी खोचक टिका राऊत यांनी कुणाचेही नाव न घेता राज्यातील सत्ताधाऱ्यांवर केली.

देशाच्या न्यायव्यवस्थेत काय सुरु आहे? हे सर्वांना माहीत आहे. पण कोर्टात अजून सत्व आणि तत्व टिकून असल्याचे राऊत यांनी सांगत दुर्दैवाने आजचं मरण उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार करत आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडले जातात. त्यामुळे आम्ही अपेक्षेने न्यायालयाकडे पाहतो आहोत. असं राऊत यांनी पत्रकारांशी दिल्लीत संवाद साधताना सांगितले.


Tags:    

Similar News