मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गावर...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गावर... Uddhav Thackeray on the path of pm Narendra Modi;
पंतप्रधान नरेंद्र ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेत नाहीत. अगदी त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला पत्रकार परिषद घेतली नाही. किंबहुना ठाकरे सरकारमधील एकाही मंत्र्यांनी येत्या अधिवेशनाबाबत पत्रकार परिषद घेतली नाही.
येत्या अधिवेशनात कोणकोणते मुद्दे असतील. तसंच जनतेच्या कोणकोणत्या समस्यांवर चर्चा होईल. कोणती विधेयक मांडली जाणार आहेत. या सह विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांना पूर्व संध्येला सत्ताधारी पक्ष उत्तर देत असतो. मात्र, ठाकरे सरकारच्या गेल्या काही अधिवेशनांचा कालावधी पाहता ठाकरे सरकार लोकशाहीचा संकोच करतंय का असा प्रश्न निर्माण होतो.
ज्या प्रमाणे केंद्रात नरेंद्र मोदी पत्रकार परिषद न घेता 'मन की बात' किंवा सोशल मीडियावरुन ठरावीक लोकांशी संवाद साधतात. अगदी त्याच पद्धतीने मुख्यमंत्री फेसबूक लाईव्ह द्वारे संवाद साधतात. केंद्रावर टीका केल्यास लोकांना देशद्रोही लेबल लावण्यात येतं. तर इकडे राज्यात ठाकरे सरकारवर टीका केल्यास देशद्रोही हे लेबल लावलं जातं.
त्यामुळं ठाकरे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गावर चाललं आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.