उद्धव यांच्या शिवसेनेत पुन्हा मोठं बंड...

कल्याणमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे गटामध्ये आजही अनेकजण प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत.

Update: 2023-01-27 12:31 GMT

उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेत पुन्हा एकदा मोठं बंड झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दोन गटात विभागली गेली तरी अजूनही हे वाद सुरूच आहेत. एकीकडे शिंदे गटात एकेकजण प्रवेश करताना दिसत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटानेही पक्ष वाढीसाठी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत अनेक खलबत सुरू होती. अखेर ही युती झाली, मात्र यावर कल्याणचे शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आरोप केला आहे.

वंचित आघाडी सोबत उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने युती केली तरी आजही सर्वजण शिंदे गटात सहभाग होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ठाकरेंकडे कोणता नेताच उरला नसल्याचे भोईर यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे हे स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणतात. मग प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती कशी काय? असा सवाल उपस्थित करत ही युती म्हणजे संशोधनाचा विषय आहे, असेही भोईर म्हणाले. ठाकरेंकडे आता कोणताच उद्योग राहिला नाही. त्यामुळे ते रोज एकेकाला प्रवेश देत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना नमवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. असा आरोपही कल्याणचे शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केला. 

Tags:    

Similar News