Photo courtesy : social media
आज राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांनी नारायण राणे प्रकरणानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना
मी इतकं इम्पलसिव्हली आयुष्य जगत नाही. कोणी काही बोललं तर मी थोडासावेळ विचार करते. माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही. माझं आयुष्य वास्तव आहे. त्यामुळे मी इन्स्टंट कॉफी पित नाही. मात्र, ठाकरे-फडणवीस भेटीची मला माहिती नाही. सर्व पक्षाचे नेते निवडणुका सोडून आपले वैयक्तिक संबंध चांगले ठेवत असतील तर त्याचं मनापासून स्वागत करायला हवं. माझ्यावर यशवंतराव चव्हाणाचे संस्कार झाले आहेत. त्यांचे सर्वांशी वैयक्तिक संबंध चांगले होते. राजकीय मतभेद एका ठिकाणी आणि वैयक्तिक नाती एका ठिकाणी यात काही गैर नाही. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.