उध्दव ठाकरेंनी बंडखोर खासदारांच्या शुभेच्छा नाकारल्या

Update: 2022-07-27 08:03 GMT

 शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा बुधवारी ६१ वा वाढदिवस आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. अगदी त्यांच्या बंडखोर आमदार आणि खासदारांकडूनही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या पण त्यांनी त्या नाकारल्या. या संबंधी खासदार व शिंदे समर्थक खासदारांचे संसदेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी देखील उध्दव ठाकरे यांना पक्षप्रमुख असा उल्लेख न करताच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोबत शुभेच्छांसाठी त्यांनी दरवर्षी प्रमाणे सामनात जाहिरात दिली होती पण वृत्तपत्राकडून जाहिरात छापण्यास नकार देण्यात आला असं त्यांनी सांगितलं. खासदार कृपाल तुमाने यांची देखील जाहिरात सामना कडून छापण्यास नकार देण्यात आला असल्याचं त्यांनी सागितलं.

नव्या संसदेत बाळासाहेबांचं तैलचित्र?

याशिवाय बोलताना त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र सदनामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा उभारण्याचा तसेच नव्या संसद भवनात बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. शिवाय दिल्लीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या कार्याचा गौरव केंद्र सरकारच्या माध्यमातून करणार असल्याचं ते या वेळी म्हणाले. बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही पुढे चालणार असंदेखील राहूल शेवाळे म्हणाले.

जाहीराती साठी सर्व गोष्टींची पुर्तता

मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे य़ांनी पक्षप्रमुख उल्लेख न केल्याबाबत म्हणताना ते म्हणाले की, त्यांनी उल्लेख केला नसेल तरी आम्ही मात्र जाहिरातीमध्ये सर्व गरजेच्या गोष्टींची पु्र्तता केली होती तरीही ती जाहिरात नाकारण्यात आली असल्याचं ते म्हणाले. याशिवाय उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसामुळे त्यांच्याशी संबंधीत कोणत्याही वादग्रस्त प्रश्नावर प्रतिक्रीया देण्यास शेवाळेंनी नकार दिला.

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणं अशक्य

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे वगैरे असा उल्लेख नेहमी होतो पण प्रत्यक्षात मात्र तसं काहीही नाही. कागदोपत्री आपण पाहिलं तर संवैधानिक दृष्ट्या, तांत्रिक दृष्ट्या असं कुणीही करू शकत नाही. कोणतंही सरकार आलं, कोणताही नेता येउ द्या पण मुंबई महाराष्ट्रापासून दुसरं कुणीही वेगळं करू शकत नाही. असं ते म्हणाले.

लोकसभेत शिवसेनेचा कोणताही गट नाही

मी शिवसेनेचा अधिकृत गटनेता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांना आम्ही प्राधान्य देतो. हिंदुत्वाच्या मुद्द्या वर आम्ही सगळे एकत्र आलो आहोत आणि उर्वरीत खासदार देखील आमच्यासोबत एकत्र येतात. मध्यंतरी या सगळ्यापासून दुर गेलो होतो मात्र आता आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत असंही ते यावेळी म्हणाले.

उध्दव ठाकरेंना खासदारांवर विश्वास नव्हता. आमदारांनी बंड केल्यानंतर उर्वरीत आमदारांना उध्दव ठाकरेंनी आभाराचं पत्र लिहिलं परंतू एक महिना आम्ही त्यांच्या सोबत असूनही आम्हाला कोणत्याही प्रकारचं पत्र उध्दव ठाकरेंकडून आलं नाही. उध्दव ठाकरेंमध्ये अविश्वासाची भावना. जोपर्यंत विश्वास नाही तोपर्यंत गोष्टी सुधरणार नाहीत

एकनाथ शिंदेंच्या समर्थक खासदारांची संख्या वाढणार हिंदुत्व आमचा श्वास आणि ध्यास त्याच्यापासून दुर झालो तर जगूच शकत नाही. मोदींच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात समान नागरी कायदा, राम मंदीर असे अनेक हिंदुत्वाचे मुद्दे समोर येणार महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे आणि भविष्यात देखील शिवसेनेचाच असणार आहे.

Tags:    

Similar News