Dasara Melava : मातोश्रीच्या दारात राष्ट्रवादीचे बॅनर, जितेंद्र आव्हाड यांनी दिले स्पष्टीकरण

Update: 2022-10-05 02:54 GMT

शिवसेनेत फुट पडल्यानंतर मुंबईत दोन दसरा मेळावे होणार आहेत. त्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभुमीवर उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीने शुभेच्छा देणारे बॅनर लावल्याचे समोर आले. त्यावरून भाजपने टीका केली होती. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले.

शिवाजी पार्क येथे होणारा मेळावा शिवसेनेचा नसून महाविकास आघाडीचा होणार असल्याची टीका केली जात आहे. त्यातच मातोश्रीबाहेर उध्दव ठाकरे यांना शुभेच्छा देणारे राष्ट्रवादीचे बॅनर लावण्यात आले. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता नाही, मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. आमचा उध्दव ठाकरे यांच्या मेळाव्याशी काहीही संबंध नाही. मात्र मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवतीर्थ असे समीकरण आहे. तसेच महाविकास आघाडीतर्फे लावण्यात आलेल्या बॅनरवरून बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, दहावी-बारावीच्या मुलांना आपण शुभेच्छा देतो. म्हणजे आपण दहावीच्या परीक्षेला बसतो का? असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर पलटवार केला.

भाजपने उध्दव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर टीका केली होती. हा शिवसेनेचा नसून महाविकास आघाडीचा दसरा मेळावा असल्याचे म्हटले होते. मात्र अखेर राष्ट्रवादीने यावर प्रतिक्रीया दिली आहे. तसेच आव्हाड यांनी राष्ट्रवादीचा या मेळाव्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.




Tags:    

Similar News