आरोप करणाऱ्यांना माझ्यामुळे भाकरी मिळते, ठाकरे बंधू भिडले
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र त्याला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.;
राज ठाकरे (Raj Thackeray allegation against Uddhav Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर महापौर बंगला बळकावल्याची टीका केली होती. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
काही जण माझ्यावर टीका करतात. त्यांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरीच मिळत नाही. माझ्यावर टीका केल्यामुळे त्यांना भाकरी मिळते, याचं मला समाधान, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
राज ठाकरे यांचा आरोप काय? (Raj Thackeray Allegation)
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष कोकणात येऊन गेले. पण त्यांना बाळासाहेबांच्या नावाखाली मुंबई महापालिकेचा महापौर (Mumbai Mayor Bungalow) बंगला ढापला आहे आणि आता लोकांच्या मनात ते आपल्या मनात असं सांगत फिरत आहेत. पण तुम्ही लोकांना विचारलं का कधी? अशी खरपूस टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर रत्नागिरीतील सभेत केली होती.