आज शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी, भाजप पासून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून (ठाकरे गट) एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भक्त अंध समजू शकतो पण गुरु सुद्धा असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांना देखील लक्ष केले. उद्धव ठाकरे काय म्हणाले वाचा उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण...
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, तोच जोश तोच उत्साह आणि तीच गर्दी. अनेक दिवसानंतर एका मोकळे वातावरणात शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस. हे समोर जे आहे ते विकल्या जाऊ शकत नाही. मला पण एक माहिती कळाली, राऊतांना अनेक देशाचे पंतप्रधान भेटले. मला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भेटले मला म्हणाले मी उद्या भाजपात चाललोय. उद्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंधे गटात अथवा भाजपात गेलेत तर नवल नाही. आज प्रकाश आंबेडकर सोबत आले. देशाची लोकशाही धोक्यात. त्यांचे हिंदुत्व थोतांड. कलिना विद्यापीठाच्या कार्यक्रमाची आठवण. आज दोन्ही नातू एकत्रित आले. चीन दौऱ्याची आठवण. आज सुभाषबाबूंचा, प्रमोद नवलकरांचा वाढदिवस. तिकडे विधिमंडळात बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण. परवा बाळासाहेबांचाचा माणूस, काल मोदींचा माणूस आता पवारांचा सल्ला घेतो. मग मी काय घेत होतो? सरदार पटेल, बाबासाहेब, बाळासाहेब पण आमचेच. मोदी असले तरी बाळासाहेबांशिवाय तुम्ही कुणीच नाही हे तुम्हीच सिध्द केले. या महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही.
आपल्या कामाचेच पंतप्रधानांनी भूमिपुजन केले. तीन वर्ष आम्ही काम केले म्हणून तुम्ही भूमिपुजन करु शकलात. मोदी जे बोलले ते भयानक आहे. भक्त अंध समजू शकतो पण गुरु सुध्दा. २००२ पर्यंत मुंबई मनपा तुटीत होती. तेव्हाचे आयुक्त सुबोधकुमार आणि आपल्या लोकांनी ती सशक्त केली. कोस्टल रोड विना टोल आपण देतोय. मनपाचा उपक्रम हा त्या ठेवीतून. त्यातील ३०-४०% रक्कम हा कामगारांचा आणि इतर कामांचा. त्यांना मुंबई ही सोन्याची कोंबडी वाटते, त्यांना ती कापायची आहे. मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मराठी माणसाची मुंबई आपण त्यांच्या हाती जाऊ देणार नाही. ही कसली बाळासाहेबांची माणसं? कोश्यारींना खर तर हाकलून द्यायला हवे होते. आज बाळासाहेबांच्या जयंती निमित्त ही बातमी आली.
महापुरुषांचा अपमान सहन करणारे ही कसले बाळासाहेबांची माणसे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. हे दगडविटांच्या आहेत. दगडाचा उपयोग कोण कोण कस करत हे सगळ्यांना माहिती आहे. आज नाटक आहे आमनेसामने. पुढे सभा घेऊच. आता होऊन जाऊ देऊ आमने सामने.