उद्धव ठाकरे यांना नेता मानतात का? गुलाबराव पाटील म्हणतात...
उद्धव ठाकरे यांना शिंदे गट नेता मानतो का, मंत्रिमंडळविस्तार लांबल्याने बंडखोर आमदार अस्वस्थ आहेत का, याबाबत गुलाबराव पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांनी...;
शिवसेनेतील बंडखोर आमदार आम्ही आजही शिवसेनेत आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी आदर आहे असे सांगत असतात. पण उद्धव ठाकरे यांना नेता मानतात का? या प्रश्नावर मात्र आमदार यांनी बोलणे टाळल्याने शिंदे गटाच्या मनात काय आहे, असाच प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
"आमचा नेता बाळासाहेब ठाकरे, आमचा झेंडा भगवा, आमचं ठिकाण शिवतीर्थ" असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. मात्र उद्धव ठाकरेंना नेता मानतात या प्रश्नावर गुलाबराव पाटील यांनी सोयीस्कररित्या उत्तर देण्याचं टाळल. पाटील यांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंना शिंदे गट महत्व देत नाही का ? असाही प्रश्न निर्माण झालाय. शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा, यावरही पाटील यांनी सूचक वक्तव्य करत लवकरच निर्णय होईल असं म्हटले आहे. गुलाबराव पाटील यांच्याशी बातचीत केली आहे.