सातारा जिल्हा बँकेची निवडणूक येत्य़ा काही काळाच होणार आहे. यावरून साताऱ्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळत आहे. अशातच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
यावेळी टीका करताना ते म्हणाले, "पॅनेलमध्ये मला घेणारे ते कोण? मी ठरवतो कुठे जायचे ते… माझी जिरवण्यासाठी फील्डिंग लावणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, माझी जिरवा पण सभासदांची जिरवू नका.", असे टोमणे मारत खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी पॅनलवर निशाणा साधला आहे.