छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्य वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पदावरून हटवावे यासाठी आज उदयनराजें भोसलेंनी रायगडावर जाऊन आक्रोश मेळाव्यात अप्रत्यक्षरित्या भाजपवर टीका केलीय. राज्यपालांना दूर केलं नाही तर येत्या काही दिवसात मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशाराच भाजपला उदयनराजेंनी दिलाय...
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य केलं मात्र एकही नेता आक्षेप नोंदवत नाही , यावर बोलत नाही , महाराजांविरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱ्यांना नेत्यांचं समर्थन आहे का ? असा थेट सवालच उदयनराजेंनी केलाय.
पूर्वी काळी देश मोघलांच्या ताब्यात होता शिवाजी महाजारांनी विकृत लोकांच्या तावडीतून सोडवला , आता पुन्हा विकृत लोकांच्या हातात देश गेलाय याची खंत वाटते.आता तुम्हीच लोकशाहीचे राजे आहेत.आता तुम्हीच या देशाला बाहेर काढू शकतात असंही उदयनराजेंनी म्हटलंय.
उदयनराजेंनी सर्वच राजकीय पक्षांवरही जोरदार टीका केलीय. सर्व राजकीय पक्ष स्वार्थी झालेत, महाराजांनी सर्वधर्मीयांना एकत्र केलं. मात्र राजकीय नेत्यांकडून स्वार्थासाठी शिवाजी महाराजांविषयी तेढ निर्माण केली जात आहे. सर्वधर्मसमभावाचा विचार स्वार्थासाठी वापरला जात असल्याचा उल्लेख काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका उदयनराजेंनी केलीय.