सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी तुपकरांचा सहकार मंत्र्यांना घेराव
सोयाबीन, कापूस भाव वाढ व शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेवुन बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्याचे सहकार मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांना घेराव घातलाय. शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात रविकांत तुपकर यांनी चर्चा केलीये, दरम्यान रविकांत तुपकर यांनी केलेल्या मागण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिलीये.
सोयाबीनला साडे आठ हजार व कापसाला बारा हजार रुपये भाव वाढ करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नुकताच यलगार मोर्चा काढलाय, यामध्ये 29 नोव्हेंबरपर्यंत सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा तुपकरांनी दिला. दरम्यान आज गुरुवारी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील हे बुलढाणा दौऱ्यावर होते. तुपकर यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक विश्रामभावनावर पाटील यांना घेराव घातला, दरम्यान रविकांत तुपकर यांनी केलेल्या मागण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिलीये.