पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना EDने मनी लाँड्रिग प्रकरणात नीस बजावली आहे. त्यांना चौकशीसाठी दिल्लीत हजर राहण्याचे समन्स बजावण्या आले आहे. दरम्यान अभिषेक बॅनर्जी यांनी आपण चौकशीसाठी तयार आहोत आणि एवढेच नाही तर आपण दोषी सिद्ध झालो तर जनतेसमोर फाशीची शिक्षा भोगण्यास तयार आहोत, असे म्हटले आहे.
अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बर इथून खासदार आहे. तसेच ते तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीसही आहेत. प. बंगालमधील कोळसा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात बॅनर्जी यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवारी दिल्लीत याप्रकरणी चौकशी होणार आहे. अभिषेक बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांचे राजकीय वारसदार मानले जातात. त्यामुळे एकप्रकारे ममता बॅनर्जी यांना या कारवाईतून इशारा देण्यात आला आहे का अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव केल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार असा संघर्ष आणखी वाढला आहे.