लसीचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल रेल्वे प्रवासाची परवानगी द्या: प्रहारची मोदींकडे मागणी

लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर परदेशी विमान प्रवासास परवानगी आहे. तर लोकल प्रवासाला का नाही? प्रहार जनशक्ती पक्षाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र;

Update: 2021-07-01 09:06 GMT

जवळपास दीड वर्षे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून भारतात लॉकडॉउन आहे, या काळात बऱ्याच लोकांचे जॉब गेले, व्यवसाय ठप्प झाले. काहींच्या घरचे जबाबदार आणि कर्ते माणसं-स्त्री यांचा बळी या कोरोनाने घेतला. आज कोरोना लस जगात सापडली आहे आणि आपल्या देशात लसीकरण होत आहे, तर लसीकरण झालेल्या व्यक्तींना कामा निमित्त प्रवास करू देने हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी लसीकरणावर विश्वास ठेवला असून मुंबईत पब्लिक प्रवासात सर्वात परवडणारी आणि सुविधाजनक असणारी प्रवास सेवा ही लोकल आहे.

मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल रेल्वे खाजगी कर्मचारी व कष्टकरी नागरिकांना नाकारली गेल्याने त्यांचे जीवनमानही ठप्प झाले आहे. तसेच बससेवेवर प्रचंड ताण येत असून, सर्वसामान्य चाकरमान्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे, बस मध्ये होणाऱ्या गर्दी मुळे कोरोना आजाराचा प्रसार होण्याची शक्यता ज्यास्त आहे.

आसपास पाहिलं तर जाणवतं की प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे काहींचे अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, स्वभाव बदलले आहेत, सवयी बदलू लागल्या आहेत. कुणाची स्थिरता गेली तर कुणाची विचारशक्ती. काहींनी एकाग्रतेची सवय घालवली तर काही साधं एकमेकांशी संवाद साधण्याचं कौशल्य गमावून बसले.

मानसशास्त्रज्ञांना हे आव्हान आहे, आगामी काळात हे मोठे आवाहन आहे, २ लस घेतल्यावर परदेशी विमान प्रवासास परवानगी आहे, तेव्हा मुंबईची लोकल 2 लसीकरण पूर्ण केलेल्यासाठी चालू करावी व सर्वसामान्य चाकरमान्यांचे जीवन सुरु करावे. अन्यथा प्रहार जनशक्ति पक्षातर्फे आंदोलन सुरु करण्यात येईल असं प्रहार जनशक्ति पक्ष प्रवक्ता मनोज टेकाडे आणि प्रहार जनशक्ती पक्ष संपर्क प्रमुख अजय तापकिर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

CENTRAL RAILWAY, INDIAN RAILWAY, MUMBAI, MUMBAI LOCALTRAIN, WESTERN RAILWAY

Tags:    

Similar News