हा तर कटाचा भाग: किरीट सोमय्यांचा ठाकरेंवर पलटवार
माहिती अधिकारात कागदपत्रे तपासत असताना प्रताप सरनाईक तेथे आले कसे, माझ्या सोबत सेल्फी घेतला कसा? हा एका कटाचा भाग असू शकतो, माझ्यावर या आधी हल्ला आणि जीवे मारण्याचे प्रयत्न झाले आहेत. किरीट सोमय्यांचा उध्दव ठाकरेंवर हल्ला केला आहे.;
किरीट सोमय्या यांनी नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स पहिल्याची छायाचित्रे नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान देत हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा असं प्रतिआव्हान दिलयं.
ठाकरेंनी चोरी लबाडी करायची आणि लोकांना लुटायचे आणि मग घोटाळा बाहेर आला की अशी कारवाई करायची. ज्या शिंदे यांनी मला ही नोटीस पाठवली त्यांना देखील मी विचारणार आहे की, तुम्ही कोणत्या आधारे ही नोटीस पाठवली. ही नोटीस शिंदे यांनी मागे घ्यावी आणि माफी मागावी अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.
"फोटो कुणी काढला कुणी व्हायरल केला हा गोंधळ सुरू आहे. किरीट सोमय्या बसलेले आहेत आणि दोन कर्मचारी आहेत. म्हणजे आमच्या तिघांपैकी तर कुणी फोटो काढलेला नाहीय. मी तर एकटाच होतो मग फोटो काढला कुणी आणि व्हायरल केला कुणी? उद्धव ठाकरेंच्या माणसांनी काढला? की आदित्य ठाकरेंच्या एजंटनी काढला? की एकनाथ शिंदे यांच्या पीएनी की प्रताप सरनाईक? कुणी काढला फोटो? किरीट सोमय्या खुर्चीवर बसले हा विषय नाही. तर कुणाची खुर्ची धोक्यात आहे? याचा तपास व्हायला हवा. असे प्रश्न उपस्थित करत सोमय्यांनी आरोप केला आहे.
मंत्रालायत कुणाला जाऊ दिले जात नाही. मग किरीट सोमय्या मंत्रालयात चौथ्या मजल्यावर गेले त्यावेळी तिथे फोटो काढणार तो माणुस कोण मंत्रालायतील कार्यालयात फोटो काढता येत नाही मग ती व्यक्ती कोण? मला माहिती मिळाली त्यावेळचे सीसीटीव्ही देखील गायब करण्यात आले आहे असे सोमय्या यांनी सांगितले.
अशी गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही. प्रताप सरनाईक यांच्यासोबत जो व्यक्ती आला होता त्याने फोटो काढला असावा असे वाटते. एवढं नाटक उद्धव ठाकरे यांनी का करावे? फोटो व्हायरल करतात आणि नोटीस आम्हाला देतात
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी आपण कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नसल्याचे सांगितले. तसेच मी कोणाच्या फाईल्स पाहिल्या, याची भीती काँग्रेसला का वाटत आहे, असा सवालही किरीट सोमय्या यांनी शेवटी उपस्थित केला आहे.