मागील सरकारपेक्षा या सरकारने पूरग्रस्तांना कमी मदत केली - मुंगटीवार
मागील सरकारपेक्षा महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्तांना कमी मदत केली असं म्हणत भाजप नेते सुधीर मुंगटीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला;
मुंबई : महाविकास आघाडीने पूरग्रस्तांना जी मदत केली आहे ती शुध्द फसववणूक असून फडणवीस सरकारने पूरग्रस्तांना जेवढी मदत केली होती, त्यापेक्षा खुप कमी मदत या सरकारने केली आहे असा आरोप भाजप नेते तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुंगटीवार यांनी केला आहे. मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मागील महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात महापुर परिस्थिती निर्माण झाली. या पूरात लोकांचे संसार उध्वस्त झाले. त्यांना दिलासा हे सरकार देईल असे वाटत होते पण त्यांची शुध्द फसवणूक करण्यात आल्याचं मुंगटीवार यांनी सांगितलं.
11 हजार 500 कोटींमध्ये 7 हजार कोटी हे दिर्घकालीन कामांसाठी आहेत. याचाच अर्थ हे पैसे पूरग्रस्तांसाठी नाहीत. आपण प्रशासनावर चार दिवसात 1600 कोटी आणि पूरग्रस्तांचं आयुष्य उध्दवस्त झाले त्यासाठी 1500 कोटी याचाच अर्थ मदतीचं पॅकेज म्हणजे मोठी फसवणूक आहे असा दावा मुंगटीवार यांनी केला. 29 ऑगस्ट 2019 रोजी मागच्या सरकारने जीआर काढला होता. त्यावेळी दिवाकर रावते, रामदास कदम हे मंत्री असताना पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आग्रह धरला होता. त्यानुसार सरकारने जीआर काढला होता. त्या जीआरमध्ये ज्यांची घरं पूर्णपणे उध्दवस्त झाली त्यातल्या शहरी भागातल्या लोकांना 36 हजार रूपये भाडं दिलं. ग्रामिण भागात 24 हजार भाडं दिलं. ज्यांचं पूर्ण घर बाधित झालं त्यांना 95 हजार 100 रूपये त्यांच्या खात्यात वर्ग केले.
पंतप्रधान आवास, शबरी आवास, रमाई आवास योजने अंतर्गत त्यांची घर बांधून दिली. शेतीचं नुकसान झालं त्यांना एसडीआरएफ निकषापेक्षा तीन पट मदत केली. पण महाविकास आघाडीचं सरकार पुरग्रस्तांना कमी मदत करत आहेत. असं मुंगटीवार यांनी म्हटलं आहे. आता सरकार म्हणत आहे की, 11 हजार 500 कोटी मदत केली, पण हे ही मदत दिर्घकालीन कामासाठी आहे. यातील केवळ 1500 कोटीच पूरग्रस्तांसाठी आहेत हे मात्र, हे सरकार सांगत नाही असा टोलाही मुंगटीवार यांनी लगावला.
पॅकेजमध्ये समुद्रला भिंत बांधणार आहेत असं म्हणत आहेत पण ते कुठे बांधणार आहेत? कशी बांधणार आहेत? त्याचा किती फायदा होईल? याचा कोणताही आराखडा नसल्याचं मुंगटीवार यांनी सांगितलं. रस्ते दुरूस्ती करणार आहेत त्यासाठी 3000 हजार कोटी मदत करणार पण ते कुठे करणार याचे स्पष्ट नाही. कोणत्याही कामाचे इस्टीमेंट नाही कॅबिनेट तयार करायला पाहिजे ती देखील नाही फक्त अंदाजे पॅकेजची घोषणा केली असं मुंगटीवार यांनी म्हटलं आहे.
सोबतच मुंगटीवार यांनी म्हटलं आहे की, सरकारने ज्या मदतीची घोषणा केली आहे त्यात कोणत्याही कामाचा आराखडा, कामाची नोट, कामांची मंजूरीचे आराखडे बनवलेले नाहीत. हे अत्यंत गंभीर असून काय कामे होणार आहेत हे स्पष्ट केलं नसल्याचं ते म्हणाले. हे सगळे प्रश्नं आम्ही अधिवेशनात मांडू पण ते अधिवेशन घ्यायला तयार नाहीत अशी खंतही मुंगटीवार यांनी केली आहे.
कोकणातील अवस्था वाईट आहे. शिवसेनेवर कोकणाने भरभरून प्रेम केलं आहे पण महाविकास आघाडीने कोकणाचा विश्वासघात केला असंही मुंगटीवार यांनी मुलाखतीत सांगितलं. मुंगटीवार यांची सविस्तर मुलाखत आपण मॅक्स महाराष्ट्रच्या फेसबुक पेज आणि युट्युब चॅनेलवर पाहाता येईल.