महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही- बाळासाहेब थोरात

Update: 2021-09-19 09:47 GMT

अहमदनगर : महाविकास आघाडीमधील मित्र पक्षात कोणतीही नाराजी नसून, भारतीय जनाता पार्टीतील अनेकजण महाविकास आघाडीत येऊ इच्छित आहे, मुख्यंमंत्री उध्दव ठाकरे यांचे ते वक्तव्य म्हणजे प्रवेश करू इच्छिनाऱ्यांसाठी निमंत्रण असल्याचे महसुलमंत्री थोरात यांनी म्हटले आहे ते आज संगमनेर येथे बोलत होते.

महसुलमंत्री मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत आज संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे कृषी भुषन कैलासवासी फादर बाखर यांना अभिवादन करण्यात आले, यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना संगमनेरमध्ये पक्षीय मेळावा घेणाचा अधिकार असून त्यांनी पक्षीय मेळावे केलेच पाहीजे असा टोला मंत्री थोरात यांनी लगावला. बाळासाहेब थोरात हे आज संगमनर तालुक्याच्या पठारभागाच्या दौऱ्यावर आहेत .त्यांनी आज कृषीभुषन कैलासवासी फादर बाखर यांना अभिवादन केले. या दौऱ्यात त्यांच्यासोबत हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार,पठार भागातील गटनेते अजय फटांगरे, बाजीराव पाटील , शंकराव पाटील, मीरा शेटे व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

Tags:    

Similar News