२५ हजाराचा निधी मंजूर करून घेण्यासाठीच सरकारने अधिवेशन बोलावलं – नाना पटोले

गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा गुरूवारी अखेरचा दिवस आहे. विक्रनी अशा 23 लक्षवेधी सभागृहात मांडण्यात आल्या. अनेक महत्वाचे निर्णय या अधिवेशनामध्ये घेण्यात आले. पण काँग्रेस अध्यक्ष नान पटोले यांनी मात्र सरकारवर टीका केली आहे. 25 हजार रूपयांचा निधी मंजूर करून घेण्यासाठी सरकारने हे अधिवेशन बोलावले असल्याची त्यांनी टीका केली.

Update: 2022-08-25 11:16 GMT

नाना पटोले हे संपुर्ण अधिवेशनाबद्दल बोलत होते त्यावेळी त्यांनी, "हे अधिवेशन जनतेच्या आशा - आकांक्षांचं होतं. परंतू सरकारने जनतेची पार निराशा केली. इतकंच काय राज्याच ओला दुष्काळ पडलेला असताना सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही, त्यांच्या तोंडाला अक्षरशः पानं पुसली. शिवाय आदिवासींवरील प्रश्नावर दोन दिवसात सरकारला व्यवस्थित उत्तर देखील देण्यात आलं नाही. त्यांनी सारी गोलमोल उत्तरं दिली. आदिवासींचं कुपोषण होत नाही, ते तंदुरूस्त आहेत असं उत्तर सराकारने दिलं.

2019 आधीचं फडणवीस सरकार आता पुन्हा एकदा सत्तेत आलं आहे. फक्त त्यांनी खुर्च्यांची अदलाबदल केली. त्यामुळे पुर्वी जसं ऑनलाईन अर्ज मागवण्याचं फोल काम त्यांनी केलं होतं तसंच ते आता देखील करण्याची शक्यता आहे. या सरकारना ऑनलाईन अर्ज मागवुन बेरोजगारांचे खिसे रिकामे करायचे आहेत. शासनाने तात्काळ सर्व क्षेत्रातली नोकरभरती तात्काळ सुरू करावी. आतापर्यंत विरोधी पक्षांच्या वतीने जनतेचे प्रश्न विधानसभेत लावून धरले गेले. मात्र मंत्र्यांनी त्याची थातूर मातूर उत्तरं दिली. फक्त 25 हजार रूपयांचा निधी मंजूर करून घेण्यासाठी सरकारने हे अधिवेशन बोलावल्याची तक्रार केली.

याशिवाय राज्यातील खड्ड्यांच्या प्रश्नावर देखील नाना पटोले यांनी सराकरवर टीका केली. त्यावेळी हे सरकार मलाईच्या खात्यात रमलेलं आहे. मंत्र्यांना कोणतं खातं मिळालं आहे हेच त्यांना ठाऊक नाही. त्यामुळे सध्या रस्त्यांची सध्याची अवस्था पाहून ते गायब झाले आहेत असंच म्हणावं लागतंय. शिवाय बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 26 ऑगस्टला मुंबई गोवा महामार्गाचा दौरा करणार असल्याचं म्हटलं होतं त्यासाठी सर्वपक्षीय़ नेत्य़ांना त्यांनी आमंत्रीत केलं होतं. ते आमंत्रणाला कॉंग्रेसचे प्रतिनिधी प्रतिसाद देतील. गावागावातील कार्यकर्ते मंत्र्यांच्या स्वागताला खड्डे दाखवण्यासाठी हजर असतील. शिवाय बुधवारी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या धक्काबुक्कीवर बोलताना विरोधी पक्ष पुन्हा असं कृत्य करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

शिवाय आरे मधील कारशेड प्रकरणावरही ते बोलले. मेट्रोचं कारशेड हे आरे मध्ये होता कामा नये. आरेच्या जंगलातून मुंबईला ऑक्सिजन मिळतं. वारंवार काँग्रेसनं जंगलं वाचावी यासाठी आंदोलनं केली आहेत आणि .यापुढेही करत राहणार आहे. अशी प्रतिक्रीया नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Tags:    

Similar News