Telangana : तेलंगणात आमदारांना कोट्यावधींची ऑफर, पोलिसांनी उधळला कट
तेलंगणा राज्यात सत्तारुढ पक्षाचे (TRS) आमदार फोडण्यासाठी भाजपने कोट्यावधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.;
तेलंगणा राज्यात हैद्राबादमध्ये सायबराबाद पोलिसांनी सत्तारुढ TRS पक्षाच्या आमदारांना फोडण्यासाठी कोट्यावधी रुपये देण्याचा कट पोलिसांनी उघड केला आहे. यामध्ये पी. रोहित रेड्डीसह (P Rohit Reddy) चार आमदारांना ऑफर दिल्याचे समोर आले आहे. यामध्ये डील करून देणाऱ्या आमदारास 100 कोटी (100 cr offers) तर उर्वरित आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचे सायबराबाद पोलिस आयुक्त स्टीफन रवींद्र (Stephan Ravindra) यांनी सांगितले आहे. त्यामुळे तेलंगणामध्ये असलेले केसीआर (KCR government) सरकार पाडण्याचा कट उधळला असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान TRS नेता सतिश रेड्डी यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये हॉटेल व्यावसायिकाकडे हात करत हे केंद्रीय मंत्री जय किशन रेड्डी (jai kishan reddy) यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले आहे. तसेच ते आमदारांना लाच देणाऱ्यांपैकी एक असल्याचे म्हटले आहे.
याबरोबरच तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रवक्ता कृष्णक (TRS spokeperson krushank) यांनी म्हटले आहे की, TRS चे आमदार विकण्यासाठी नाहीत. मुनुगोडे पोटनिवडणूकीच्या (munugode bypoll) आधी राजकीय दलालांच्या माध्यमातून TRS चे चार आमदार फोडण्याचे सुरु असलेला प्रयत्न रंगेहात पकडला आहे. ज्यामध्ये भाजपकडून करोडो रुपये आणि दिलेली ऑफर समोर आली आहे. या प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी सतिश शर्मा, साधू सिंहाजी आणि व्यावसायिक असलेल्या नंदकुमार यांना अटक केली आहे.
सायबराबाद पोलिसांनी NDTV ला दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या तक्रारीनंतर अजीज नगर येथे असलेल्या फार्म हाऊसची झडती घेतली. यामध्ये आमदारांना देण्यात येत असलेली लालच आणि लाच यासह पदाबाबतची ऑफर आढळून आली.
पोलिसांनी सांगितले की, तीन लोक हैद्राबाद येथे आले होते. त्यांची अनेक दिवसांपासून बोलणी सुरू होती. त्यामध्ये पी रोहित रेड्डी सोबत त्यांनी 100 कोटी रुपयांची डील केली होती. तसेच प्रत्येक आमदारास 50 कोटी रुपये देण्याचे कबुल केले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेले तीन लोकांपैकी एक हरियाणातील फरीदाबाद येथील सतीश शर्मा उर्फ राम चंद्र भारती, दुसरा व्यक्ती तिरुपतीचे के डी सिम्हायाजी आणि तिसरा व्यावसायिक नंदकुमार असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले की, खोटी ओळख सांगून हे लोक हैद्राबाद येथे आले होते. त्यांनी जी बलाराजू, बी हर्षवर्धन रेड्डी, आर के राव आणि रोहित रेड्डी यांना ऑफर दिल्याचे समोर आले. यापुर्वीही 2019 मध्ये भाजपने तेलंगणामध्ये ऑपरेशन लोटस राबवण्याचा प्रयत्न केला होता. पंजाब आणि दिल्लीतही भाजपने ऑपरेशन लोटसचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात भाजपला अपयश आले. त्यापाठोपाठ भाजपने दावा केला होता की, TRS चे 18 आमदार भाजपमध्ये सामील होऊ शकतात.