निवडणुकीच्या तोंडावर योगींना मोठा झटका, राजीनामा देत मंत्र्याचा सपा मध्ये प्रवेश
योगी यांच्या मंत्र्यांनी का दिला राजीनामा? काय आहे खरं कारण वाचा…
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर राजकारण चांगलंच तापलं आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्यां यांनी कॅबिनेट पदाचा राजीनामा देत सपामध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते पक्षामध्ये नाराज होते, त्यांनी आज आपला राजीनामा राज्यपालांना सोपवला. या राजीनाम्यात त्यांनी हिंदीमध्ये "माननीय राज्यपाल जी, राज भवन, लखनऊ,उत्तर प्रदेश. महोदय, माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी के मंत्रिमंडल में श्रम एवं सेवायोजन और समन्वय मंत्री के रूप में विपरीत परिस्थितियों और विचारधारा में रहकर भी बहुत ही मनोयोग के साथ उत्तरदायित्व का निर्वहन किया है किंतु दलितों, पिछड़ों, किसानों बेरोजगार नौजवानों एवं छोटे- लघु एवं मध्यम श्रेणी के व्यापारियों की घोर उपेक्षात्मक रवैये के कारण उत्तर प्रदेश के मंत्रिमंडल से मैं इस्तीफा देता हूं. सादर, स्वामी प्रसाद मौर्य" असं म्हणत आपण दलित, मागासवर्गीय, शेतकरी, बेरोजगार यांच्यासाठी राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.
राजीनामा का दिला?
स्वामी मौर्य हे योगी सरकार मध्ये मंत्री होते. त्यांची मुलगी संघमित्रा मौर्य सध्या बदायूँ मधून खासदार आहे. तर आता मुलाला भाजपनं तिकीट द्यावं असा त्यांचा आग्रह होता. परंतु भाजपकडून त्यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नाही. त्याशिवाय स्वामी प्रसाद मौर्य यांचे तिकीट यावेळेस कापण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. त्याअगोदरच मौर्य यांनी भाजपाला रामराम केला. तर या संदर्भात एक मत प्रवाह असा देखील आहे की, या ठिकाणी सपाची ताकद मोठी आहे. आणि या मतदारसंघात भाजपला यश मिळू शकत नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.
तीन पक्ष बदलले?
स्वामी मौर्य हे बसपामध्ये होते. ते मायावती यांचे अतिशय निकटवर्तीय होते. बसपामध्ये त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा. परंतु २०१६ मध्ये बसपा सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. आता ५ वर्षानंतर पुन्हा भाजपला सोडचिट्ठी देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला.