OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने आता थेट मंत्रालयावर मोर्चा काढला. पण राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्या राज्यस्तरीय अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात एकत्र लढण्य़ाबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांचे बोलणे झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली. पण त्यानंतर शिवराज सिंग चौहान दिल्लीत गेले आणि त्यांची कुणासोबत तरी भेट झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात मध्य प्रदेश स्वतंत्रपणे लढल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. ती भेट कुणासोबत झाली आणि त्यामध्ये असा निर्णय का झाला, असा सवाल आपण मोदी सरकारला विचारणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.