Supreme court : उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना भवन आणि पक्ष निधीबाबत चर्चांना उधाण आले होते. यासंदर्भात आशिष गिरी (Adv. Ashish Giri) नावाच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला.
निवडणूक आयोगाने (ECI) शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर शिवसेना भवन आणि पक्षनिधी संदर्भात एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेशी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा प्रत्यक्षात कोणताही संबंध नव्हता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत वकिलाला चांगलेच फटकारले.
Adv. आशिष गिरी (Adv. Ashish Giri) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे असलेले शिवसेना भवन आणि पक्षनिधी हा एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हानंतर शिवसेना भवन (Shivsena Bhavan) पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यातच कोर्टाने याचिका दाखल करून घेतल्याने उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. तसेच आशिष गिरी यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदे यांना देण्याची मागणी केल्यावरून सुप्रीम कोर्टाने Adv. आशिष गिरी यांना चांगलेच सुनावले. शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदे यांना देण्याची मागणी करणारे तुम्ही कोण? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
सुप्रीम कोर्टाने आशिष गिरी यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे शिवसेना भवन आणि पक्षनिधी बाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.